-
अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. टीव्ही आणि ओटीटीवर अभिनयाची जादू दाखवणारी करिश्मा लवकरच आई होणार आहे.
-
करिश्माने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली. लग्नाच्या ४ वर्षांनंतर तिच्या घरात पाळणा हलणार आहे.
-
वयाच्या ४२ व्या वर्षी करिश्मा आई होणार आहे. पती वरुण बंगेरा आणि ती आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी प्रचंड उत्सुक आहेत.
-
सोशल मीडियावर तिने आपले मॅटर्निटी फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोंमध्ये करिश्माचा ‘प्रेग्नेंसी ग्लो’ स्पष्टपणे दिसून येत आहे.
-
“एक छोटा चमत्कार आणि आमचे सर्वात मोठे गिफ्ट ऑगस्ट २०२६ मध्ये येणार आहे,” असे कॅप्शन तिने या पोस्टला दिले आहे.
-
फोटोंमध्ये छोट्या बाळाचे शूज आणि करिश्माचे पाळीव श्वानही दिसत आहेत. हे क्युट फोटोशूट सध्या खूप व्हायरल होत आहे.
-
करिश्मा गेल्या दोन दशकांपासून मनोरंजन विश्वात सक्रिय आहे. तिने अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
‘कही तो मिलेंगे’ ते ‘नागिन ३’ पर्यंतचा तिचा प्रवास प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. आता ती वैयक्तिक आयुष्यातील एका नव्या वळणावर आहे.
-
(सर्व फोटो साभार- करिश्मा तन्ना इन्स्टाग्राम)
Video: ऑनस्क्रीन लेक ४१ व्या वर्षी होणार आई, नीना कुळकर्णींची डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला हजेरी, साधेपणाने वेधलं लक्ष