-
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) सध्या तिच्या एका खास फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
-
या फोटोशूटसाठी अश्विनीने जांभळ्या रंगाची पारंपरिक पैठणी साडी नेसली आहे.
-
त्यावर अत्यंत कलाकुसर असलेले आरी वर्क ब्लाऊज अश्विनीला एक वेगळाच राजेशाही लूक देत आहे.
-
या सौंदर्याला अधिक खुलवण्यासाठी अश्विनीने मराठमोळ्या दागिन्यांचा साज केला आहे.
-
या फोटोंना अश्विनीने दिलेले कॅप्शन विशेष लक्षवेधी ठरत आहे. तिने लिहिले, ‘तुम समंदर की हक़दार हो सखी, एक क़तरे के लिए मत रोना…!!’
-
सध्या अश्विनी स्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे.
-
अभिनयाबरोबरच अश्विनी तिच्या सामाजिक कार्यासाठीही तितकीच ओळखली जाते.
-
(सर्व फोटो सौजन्य : अश्विनी महांगडे/इन्स्टाग्राम)
Video: ऑनस्क्रीन लेक ४१ व्या वर्षी होणार आई, नीना कुळकर्णींची डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला हजेरी, साधेपणाने वेधलं लक्ष