-
झी मराठी वाहिनीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका गेली दीड वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. यामधील सावली अन् सारंगची जोडी सर्वत्र प्रचंड लोकप्रिय आहे.
-
मालिकेत साध्याभोळ्या सावलीची भूमिका अभिनेत्री प्राप्ती रेडकर साकारत आहे. सावली कुटुंबाला नेहमी जोडून ठेवते, सासूबाईंच्या सगळ्या गोष्टी ऐकते. एकंदर काय तर सावली मेहेंदळे कुटुंबाची आदर्श सून आहे.
-
पण, तुम्हाला माहितीये का खऱ्या आयुष्यात सावलीची भूमिका साकारणारी प्राप्ती खूपच ग्लॅमरस आहे.
-
महत्त्वाचं म्हणजे प्राप्ती फक्त २२ वर्षांची आहे. अवघ्या २२ व्या वर्षी प्राप्तीने मोठं यश मिळवलं आहे.
-
प्राप्तीने नुकताच आपल्या कुटुंबीयांसह वाढदिवस साजरा केला. याचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
काळ्या रंगाच्या शॉर्ट बॉडीकॉन वनपीस ड्रेसमध्ये प्राप्ती खूपच सुंदर दिसतेय.
-
प्राप्तीने यापूर्वी ‘कलर्स मराठी’च्या ‘काव्यांजली’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती.
-
प्राप्तीला अभिनयासह कराटे आणि किक बॉक्सिंगची सुद्धा आवड आहे. यामध्ये तिने सुवर्णपदक जिंकलं आहे. याशिवाय प्राप्ती उत्तम डान्स सुद्धा करते.
-
दरम्यान, प्राप्तीचं सेटवर सुद्धा सर्वांशी खूपच सुंदर बॉण्डिंग आहे. तिच्या या बर्थडे फोटोंवर मेघा धाडेने “Cutieee…” अशी कमेंट केली आहे. ( सर्व फोटो सौजन्य : प्राप्ती रेडकर इन्स्टाग्राम )
Video: ऑनस्क्रीन लेक ४१ व्या वर्षी होणार आई, नीना कुळकर्णींची डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला हजेरी, साधेपणाने वेधलं लक्ष