-
Nandita Patkar and Vipul Mahagaonkar Marriage: मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील अष्टपैलू अभिनेत्री नंदिता पाटकर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
-
‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम मराठी अभिनेत्री नंदिता पाटकरने दुसरं लग्न केलं आहे.
-
नंदिता पाटकरने नाट्य दिग्दर्शक विपुल महागांवकरशी लग्नगाठ बांधली. (फोटो-अर्पिता घोगरदरे)
-
नंदिता पाटकरच्या लग्नाचे फोटो अनेक मराठी कलाकारांनी शेअर केले आहेत. (फोटो-अर्पिता घोगरदरे)
-
४४ वर्षीय नंदिता पाटकरच्या लग्नाच्या बातमीने चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. (फोटो-अर्पिता घोगरदरे)
-
चाहते नंदिता पाटकर व विपुल महागांवकर यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव करत आहेत. (फोटो-अर्पिता घोगरदरे)
-
नंदिता पाटकरचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. तेव्हापासून ती एकटीच राहत होती.
-
आता नंदिता पाटकरने पुन्हा प्रेमाला संधी दिली आहे.
-
नंदिता पाटकरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिने ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘बाबा’, ‘बालभारती’, ‘पंचक’, व ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. (फोटो- नंदिता पाटकर इन्स्टाग्राम)
USS Gerald R. Ford Aircraft Carrier: जगातील सर्वात महागडी युद्धनौका ‘USS जेराल्ड आर. फोर्ड’ तैनात; इराणला धडकी भरवणारा अमेरिकेचा नेमका प्लॅन काय?