-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने आपल्या ऐतिहासिक भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे.
-
प्राजक्ता गायकवाड सध्या सोशल मीडियावर तिच्या नवीन फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
-
प्राजक्ताने नुकतेच सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध ‘मांढरदेवी काळूबाई’ मंदिराला भेट देऊन, देवीचे दर्शन घेतले.
-
यावेळी प्राजक्ताने गडद गुलाबी रंगाचा अतिशय सुंदर आणि पारंपरिक एथनिक ड्रेस परिधान केला होता.
-
तिने हातामध्ये काळूबाई देवीची एक सुबक तसबीर (फोटो) धरली असून, ती प्रसन्न हास्यमुद्रेने पायऱ्यांवर उभी आहे.
-
आपल्या या पोस्टला तिने ‘आईसाहेब’, अशी छोटेखानी, पण मनाला भिडणारी कॅप्शन दिली आहे.
-
प्राजक्ता गायकवाड ही ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील महाराणी येसूबाईंच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली आहे.
-
प्राजक्ताची ही सात्त्विक आणि मोहक लूक सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
-
(सर्व फोटो साभार- प्राजक्ता गायकवाड इन्स्टाग्राम)
Iran Air Flight 655 US Navy Attack History: अमेरिकेची एक चूक अन् होर्मुझच्या सामुद्रधुनीत २९० प्रवाशांना जलसमाधी; ३७ वर्षांपूर्वी इराणी विमान का लक्ष्य केलं होतं?