-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लपंडाव’ मालिका सध्या प्रेक्षकांना खूपच मोठ्या प्रमाणात आहे..
-
या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री रूपाली भोसले सध्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही छटा असलेल्या दुहेरी भूमिका साकारताना दिसत आहे.
-
रूपाली या मालिकेत तेजस्विनी (सखीची खरी आई) आणि मनस्विनी (सरकार) अशा दोन परस्परविरोधी पात्रांना न्याय देत आहे.
-
मालिकेत तेजस्विनी आणि मनस्विनी या सख्ख्या बहिणी दाखवण्यात आल्या आहेत, ज्यांच्या स्वभावात जमीन-अस्मानाचा फरक आहे.
-
रूपालीने नुकतेच तेजस्विनी या पात्राच्या लूकमधील निळ्या साडीतील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंना तिने एक खास कॅप्शन दिली आहे: “शेवटचा फोटो माझा सर्वांत आवडता आहे. मला वाटलं होतं की, फोटोशूट संपलंय; पण कॅमेरामननं माझा हा कॅंडिड क्षण अचूक टिपला!”
-
तेजस्विनीचा हा साधा-भोळा लूक सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना दिसत आहे.
-
एकाच वेळी सोज्वळ ‘तेजस्विनी’ आणि करारी ‘मनस्विनी’ अशा दोन भूमिकांमधील रूपालीचे अभिनयकौशल्य प्रेक्षकांना थक्क करीत आहे.
-
(सर्व फोटो साभार- रूपाली भोसले इन्स्टाग्राम)
डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदावरून हटवण्याच्या हालचाली? अमेरिकेच्या २५ व्या घटनादुरुस्तीत नेमके काय?