-
स्टार प्रवाहवरील अतिशय लोकप्रिय ठरलेल्या ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla TV Serial) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अनघा भगरे (Anaghaa Bhagare) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
अनघा ही केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही, तर तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
आपल्या सहजसुंदर अभिनयाने अनघाने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
नुकतेच अनघाने समुद्रकिनारी एक खास फोटोशूट (Beach Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अनघाने निळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट ड्रेस परिधान केला आहे.
-
अनघाच्या या फोटोंवर अभिनेत्री ऋतुजा बागवेनेही प्रेमाचा वर्षाव करत कमेंट केली आहे.
-
आपल्या सोज्वळ आणि साध्या स्वभावासाठी ओळखली जाणारी अनघा या नव्या फोटोशूटमध्ये अतिशय मोहक दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनघा भगरे/इन्स्टाग्राम)
डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदावरून हटवण्याच्या हालचाली? अमेरिकेच्या २५ व्या घटनादुरुस्तीत नेमके काय?