-
हिंदीसह मराठी कलाविश्वात असे बरेच कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या फिल्म इंडस्ट्रीमधील करिअरची सुरुवात बालवयातच केली होती.
-
मराठी कलाविश्वात सुद्धा असा एक अभिनेता आहे. ज्याने आपल्या बालवयातच दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं आहे.
-
आता फोटो पाहून तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल… हा अभिनेता नेमका आहे तरी कोण?
-
तर, या अभिनेत्याचं नाव आहे पुष्कर जोग.
-
पुष्करने बालवयातच आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. त्याने बालपणीच ऋषी कपूर, दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे, गोविंदा, सचिन पिळगांवकर, सलमान खान, महेश कोठारे यांसारख्या दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं आहे.
-
पुष्करने जुन्या आठवणींना उजाळा देत हे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
पुष्कर बालपणी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये झळकला आहे. मात्र, त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती ‘जबरदस्त’ या चित्रपटामुळे…त्याचा हा सिनेमा प्रचंड गाजला.
-
याशिवाय पुष्कर ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सीझनचा उपविजेता सुद्धा ठरला होता.
-
पुष्कर उत्तम अभिनेता आहेच पण, याचबरोबर तो निर्माता व दिग्दर्शक म्हणूनही ओळखला जातो. ( सर्व फोटो सौजन्य : पुष्कर जोग इन्स्टाग्राम )
‘१ कोटी ४० लाख लोक बलिदानासाठी तयार’, ट्रम्प यांनी दिलेली मुदत जवळ येताच इराणचाही निर्वाणीचा इशारा