-
सोनी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) फेम अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) आपल्या विनोदी टायमिंगने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.
-
नुकताच नम्रताचा एक नवा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
-
नम्रताने तिच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये नम्रताने आकाशी रंगाची कॉटन साडी नेसली असून, त्यावर नाजूक मोत्यांची माळ आणि कानातले परिधान करत आपला लूक पूर्ण केला आहे.
-
“खूबसूरत होना जरुरी नही.. लेकिन किसी के लिये जरुरी होना खूबसूरत है…” असे खास कॅप्शन नम्रताने या फोटोंना दिले आहे.
-
नम्रताने नुकताच तिच्या ‘थेट तुमच्या घरातून’ (Thet Tumchya Gharatun Marathi Natak) या नाटकाचा अमेरिका दौरा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
-
साडीतील नम्रताच्या या साध्या पण मोहक सौंदर्यावर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नम्रता संभेराव/इन्स्टाग्राम)
सावंतवाडी अन् दोडामार्ग तालुक्यात ‘किंग कोब्रा’चे दर्शन; निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण