-
मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लग्नाचे सनई-चौघडे गुंजत आहेत. एप्रिल २०२६ च्या सुरुवातीला आणि गेल्या काही दिवसांत अनेक दिग्गज कलाकारांनी आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम आणि सर्वांचा लाडका ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणजेच गौरव मोरेने आपली मैत्रीण अभिनेत्री प्रियांका कारेकरशी अत्यंत साध्या पद्धतीने लग्नगाठ बांधली.
-
६ एप्रिल २०२६ रोजी त्यांच्या गृहप्रवेशाचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
-
अभिनेत्री ऋतुजा बागवेने त्यांच्या फोटोंवर ‘मिस्टर अँड मिसेस मोरे’ अशी कमेंट करत या वृत्ताला दुजोरा दिला.
-
‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेत्री नंदिता पाटकरने प्रसिद्ध दिग्दर्शक विपुल महागावकर यांच्याबरोबर विवाह केला.
-
एप्रिल २०२६ च्या पहिल्या आठवड्यात पार पडलेला हा सोहळा अत्यंत खाजगी आणि साध्या पद्धतीचा होता.
-
नंदिताचे हे दुसरे लग्न असून सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना जिंकणारी इशा डे मार्च २०२६ मध्ये प्रसिद्ध गीतकार अभिषेक खणकरबरोबर विवाहबंधनात अडकली.
-
या सोहळ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या संपूर्ण टीमने उपस्थिती लावून लग्नाची रंगत वाढवली होती.
-
‘उदे गं अंबे’ फेम अभिनेत्री मयुरी कापडणेने २७ मार्च २०२६ रोजी ठाण्यातील व्यावसायिक स्वप्नील मराठे यांच्याशी लग्नाची गाठ बांधली.
-
मयुरीने हे लग्न अतिशय गुपित ठेवले होते, मात्र लग्नाचे फोटो व्हायरल होताच चाहत्यांना सुखद धक्का बसला.
-
(सर्व फोटो सौजन्य : मराठी कलाकार/इन्स्टाग्राम)
सावंतवाडी अन् दोडामार्ग तालुक्यात ‘किंग कोब्रा’चे दर्शन; निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण