-
Jackky Bhagnani Birthday Post for Dhiraj Deshmukh: बॉलीवूड अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानी आणि राजकारणातील एक आश्वासक चेहरा धीरज देशमुख यांचे नाते खूप खास आहे.
-
धीरज देशमुख हे जॅकीची बहीण दिपशिखा भगनानी यांचे पती आहेत.
-
धीरज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त जॅकीने आपल्या लाडक्या दाजींसाठी सोशल मीडियावर एक अतिशय प्रेमळ पोस्ट शेअर केली आहे.
-
या पोस्टमध्ये जॅकीने धीरज देशमुख यांच्याबद्दलचा आदर आणि त्यांच्यातील घट्ट बंध व्यक्त केले आहेत.
-
“हॅप्पी बर्थडे दाजी,” असं लिहून जॅकी भगनानीने काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
-
“जेव्हापासून मी तुम्हाला ओळखतो तेव्हापासून तुम्ही प्रत्येक गोष्टीत एक प्रकारची शांतता आणि संतुलन आणताय. तुम्ही ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळता, कुटुंबासाठी ज्या प्रकारे उभे राहता आणि तुमच्यातील शांतता खरोखरच कौतुकास्पद आहे,” असं जॅकी भगनानीने लिहिलं.
-
“आपल्यामध्ये होणाऱ्या गप्पा आणि तुमचा दृष्टिकोन मला नेहमीच आवडतो, त्यातून शिकण्यासारखं खूप काही आहे. तुम्ही माझ्या आयुष्यात आहात याचा मला आनंद आहे आणि तुम्ही माझ्या कुटुंबाचा भाग आहात, हे माझे भाग्य आहे. तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख लाभो आणि हे वर्ष तुम्हाला मनापासून आवडणाऱ्या गोष्टींनी भरलेले जावो, हीच सदिच्छा!” असं जॅकी भगनानी म्हणाला.
-
सोशल मीडियावर जॅकीची ही पोस्ट सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असून, अनेकांनी धीरज देशमुखांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
(फोटो- जॅकी भगनानी इन्स्टाग्राम)
सावंतवाडी अन् दोडामार्ग तालुक्यात ‘किंग कोब्रा’चे दर्शन; निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण