-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) आणि तनुज गोवळकर (Tanuj Govalkar) १४ फेब्रुवारी २०२६ रोजी विवाहबंधनात अडकले.
-
व्हॅलेंटाईन्स डेच्या मुहूर्तावर ठाण्यात पार पडलेल्या या शाही विवाहसोहळ्याची चर्चा अजूनही सोशल मीडियावर रंगलेली आहे.
-
नुकतेच अपूर्वाने तिच्या रिसेप्शन सोहळ्यातील काही खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
रिसेप्शनसाठी अपूर्वाने पांढऱ्या रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केला होता, ज्यामध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते.
-
या लूकला साजेसा मेकअप आणि हेअरस्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
दुसरीकडे, तनुजने राखाडी रंगाचा ब्लेझर सूट परिधान करून आपला डॅशिंग अंदाज दाखवला.
-
या फोटोंना अपूर्वाने ‘Celebrating A Match Made In Heaven…’ असे खास कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर/इन्स्टाग्राम)
सावंतवाडी अन् दोडामार्ग तालुक्यात ‘किंग कोब्रा’चे दर्शन; निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण