-
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’ (Kamali TV Serial) सध्या रंजक वळणावर आहे.
-
कथानकातील भावनिक गुंतागुंत आणि कमळी-ऋषीच्या नात्यातील चढ-उतार यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच, आता मालिकेत एका ‘सरप्राइज पॅकेज’ची एन्ट्री झाली आहे.
-
लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर (Aarya Ambekar) आता या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
आर्या आंबेकर या मालिकेत ‘अनामिका’ नावाचे पात्र साकारत आहे.
-
‘अनामिका’ ही एक धाडसी, सकारात्मक आणि स्पष्टवक्ती मुलगी आहे. विशेष म्हणजे, ती मालिकेत एका म्युझिक टीचरच्या (संगीत प्राध्यापक) भूमिकेत दिसणार आहे.
-
‘अनामिका’च्या येण्यामुळे कमळी आणि ऋषीच्या आयुष्यात नेमका काय बदल घडणार, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.
-
आपल्या या नवीन अनुभवाबद्दल बोलताना आर्या म्हणाली, “मला ओशन फिल्म कंपनीकडून या भूमिकेसाठी विचारणा झाली होती. जेव्हा मला कळलं की ही व्यक्तिरेखा एका संगीत शिक्षिकेची आहे, तेव्हा मी लगेच होकार दिला.”
-
“अभिनय आणि संगीत यांचा मेळ असलेल्या भूमिका मला नेहमीच आकर्षित करतात.”
-
आर्यासाठी झी मराठी हे केवळ एक चॅनेल नसून एक घर आहे. आपल्या भावना व्यक्त करताना ती म्हणाली की, तिची खरी ओळख ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ मुळेच झाली. या व्यासपीठावर तिने स्पर्धक, परीक्षक आणि पार्श्वगायिका अशा विविध भूमिका बजावल्या आहेत.
-
आर्याच्या अभिनयाचा प्रवासही याच वाहिनीच्या चित्रपटांतून सुरू झाल्यामुळे ‘कमळी’च्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या लाडक्या वाहिनीवर परतताना ती अतिशय आनंदी आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : आर्या आंबेकर/इन्स्टाग्राम)
सावंतवाडी अन् दोडामार्ग तालुक्यात ‘किंग कोब्रा’चे दर्शन; निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण