-
लोकप्रिय विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर यांची कन्या जेमी लिव्हर सध्या तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आहे.
-
जेमीने सोशल मीडियावर लाल रंगाच्या फ्लोरल प्रिंट साडीतील तिचे अत्यंत सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने निळ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाउऊज परिधान करून साडीला एक मॉडर्न टच दिला आहे.
-
गळ्यामध्ये कोणताही दागिना न घालता, तिने केवळ कानातले आणि हातात पांढऱ्या मण्यांच्या बांगड्या घातल्या आहेत.
-
मटका किंग या आगामी वेब सीरिजच्या ट्रेलर लाँचसाठी तिने हा खास साजशृंगार केला होता.
-
या फोटोंना कॅप्शन देताना तिने चाहत्यांना विचारले की, तुम्ही मला ट्रेलरमध्ये पाहिले का?
-
या सीरिजमध्ये जेमी ‘सुलभा राव’ नावाची महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.
-
जेमीचा हा साडीतील लूक आणि तिच्या आगामी प्रोजेक्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
-
(सर्व फोटो साभार- जेमी लिव्हर इन्स्टाग्राम)
सावंतवाडी अन् दोडामार्ग तालुक्यात ‘किंग कोब्रा’चे दर्शन; निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण