-
स्टार प्रवाहवरील गाजलेली मालिका ‘स्वप्नांच्या पलीकडले’मुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौरी नलावडे (Gauri nalawade) सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
-
गौरीने मुंबईचे प्रसिद्ध ठिकाण असलेल्या ‘गेटवे ऑफ इंडिया’ परिसरात हे सुंदर आणि बोल्ड फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी तिने काळ्या-पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि काळ्या रंगाची पँट, असा स्टायलिश पेहराव परिधान केला आहे.
-
हातात चहाचा कप घेऊन निवांत क्षणांचा आनंद घेताना ती या फोटोंमध्ये दिसत आहे.
-
वाऱ्यावर उडणारे तिचे तपकिरी रंगाचे केस आणि तिची मोहक अदा या फोटोशूटमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
कट्ट्यावर हात ठेवून, डोळे मिटून घेतलेला तिचा तो फोटो आणि त्यामध्ये तिच्या मागे दिसणारे भव्य ‘गेटवे ऑफ इंडिया’चे भवताल यांमुळे या फोटोंना चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.
-
या सुंदर फोटोंना तिने अत्यंत साधे, पण अर्थपूर्ण अशी ‘मुंबई’ ही कॅप्शन दिली आहे.
-
निसर्ग, मोकळी हवा आणि साधी, पण प्रभावी फॅशन यांचा एक सुंदर मिलाफ या संपूर्ण फोटो सीरिजमध्ये पाहायला मिळतो.
-
(सर्व फोटो साभार- गौरी नलावडे इन्स्टाग्राम)
सावंतवाडी अन् दोडामार्ग तालुक्यात ‘किंग कोब्रा’चे दर्शन; निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण