-
स्टार प्रवाहवरील तू ही रे माझा मितवा या लोकप्रिय मालिकेत अंजली ही भूमिका साकारणारी अभिनेत्री रूपल नंद सध्या तिच्या खास फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
-
या फोटोशूटमध्ये रू,चपलने लाल रंगाचा पारंपरिक ड्रेस परिधान केला असून तिचा एलिगंट आणि आकर्षक अंदाज चाहत्यांना भुरळ घालत आहे.
-
ड्रेसवरील गोल्डन एम्ब्रॉयडरी आणि हलक्या नेटच्या दुपट्ट्यामुळे तिचा लूक अधिक उठावदार आणि रॉयल दिसत आहे.
-
गळ्यातील नाजूक चोकर, कानातील झुमके आणि पारंपरिक दागिन्यांनी तिच्या सौंदर्याची शोभा वाढवली आहे.
-
हातातील रंगीबेरंगी बांगड्या आणि सुंदर मेंदीमुळे तिचा लूक पूर्णपणे पारंपरिक आणि मोहक वाटतो.
-
साधा आणि नैसर्गिक मेकअप, तसेच तिचे गोड स्मित या फोटोशूटचे खास आकर्षण ठरत आहे.
-
याआधी रूपल नंदने स्टार प्रवाहवरील ‘गोठ’ मालिकेत राधा ही नायिकेची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली होती.
-
सध्या तिच्या या नव्या फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून, चाहते तिच्या या लूकवर फिदा झाले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुपल नंद/इन्स्टाग्राम)
सावंतवाडी अन् दोडामार्ग तालुक्यात ‘किंग कोब्रा’चे दर्शन; निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण