-
रश्मिका मंदाना बॉलीवूड व दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
अलीकडेच ५ एप्रिल रोजी रश्मिकाने तिचा ३० वा वाढदिवस साजरा केला.
-
अभिनेत्रीने लग्नानंतरचा पहिला वाढदिवस तिच्या कुटुंबीयांबरोबर आणि मित्र-मैत्रिणींबरोबर साजरा केला. याचे फोटो तिने नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
रश्मिकाने या पोस्टला कॅप्शन देत म्हटलं की, “माझा ३० वा वाढदिवस खूप खास होता. खूप दिवसांनंतर मी माझ्या घरी गेले, शाळेत गेले आणि लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. माझ्या कुटुंबातील जे सदस्य माझ्या लग्नाला येऊ शकले नाहीत त्यांना भेटता आलं.”
-
रश्मिकाने यावेळी कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींबरोबरचे वाढदिवस साजरा करत असतानाचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिने तिचा नवरा विजय देवरकोंडाबरोबरचेही गोड फोटो पोस्ट केलेत.
-
रश्मिका व विजय फेब्रुवारीमध्ये लग्नबंधनात अडकल्यानंतर हैदराबादमध्ये त्यांचं रिसेप्शन पार पडलं होतं. त्यानंतर रश्मिकाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या माहेरी कर्नाटकामध्ये पुन्हा त्यांचं रिसेप्शन झालं. यावेळी तिने खास पारंपरिक लूक केला होता.
-
रश्मिकाने तिच्या दुसऱ्या रिसेप्शनला कोडवा स्टाईल साडी, पारंपरिक दागिने असा लूक केला होता. त्यामुळे या लूकमधील फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला.
-
रश्मिकाबरोबर विजयनेसुद्धा हटके लूक केला होता. रश्मिकाने पारंपरिक लूक केला असला तरी विजयने मात्र रेट्रो स्टाईल वेस्टर्न लूक केला होता. त्यामुळे दोघांचेही या लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
-
सावंतवाडी अन् दोडामार्ग तालुक्यात ‘किंग कोब्रा’चे दर्शन; निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण