-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून तिथले त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये पृथ्वीक मेलबर्नमधील निसर्गरम्य वातावरणात एका कांगारूसोबत संवाद साधताना दिसत आहे.
-
यावेळी पृथ्वीकने हिरव्या रंगाचा टी-शर्ट आणि पांढऱ्या रंगाची सैल पँट असा अत्यंत कूल आणि कॅज्युअल लूक परिधान केला आहे.
-
डोळ्यावर चष्मा, हातात घड्याळ आणि कानात एअरपॉड लावलेला पृथ्वीक या फोटोंमध्ये कमालीचा स्टायलिश दिसत आहे.
-
दुसऱ्या एका फोटोत तो तलावाकाठी उभ्या असलेल्या दोन देखण्या काळ्या रंगाच्या हंसांकडे कौतुकाने बघताना पाहायला मिळतोय.
-
निसर्गाच्या सानिध्यात प्राण्यांशी मैत्री करण्याचा हा अनोखा अंदाज त्याच्या चाहत्यांना कमालीचा भावला आहे.
-
पृथ्वीक प्रताप हा मराठी मनोरंजन विश्वातील एक अष्टपैलू अभिनेता असून त्याने आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
-
अभिनयासोबतच पृथ्वीक आपल्या फॅशन सेन्ससाठी आणि ट्रॅव्हल फोटोग्राफीसाठीदेखील तरुणाईमध्ये ओळखला जातो.
-
(सर्व फोटो सौजन्य: पृथ्वीक प्रताप/इन्स्टाग्राम)
सावंतवाडी अन् दोडामार्ग तालुक्यात ‘किंग कोब्रा’चे दर्शन; निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण