-
रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांचा ३१ वा वाढदिवस आज जामनगरमध्ये अत्यंत उत्साहात साजरा होत आहे
-
या शाही सोहळ्यासाठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली असून, मध्यरात्रीपासूनच अनंत अंबानी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
शाहरुख खान, सलमान खान यांच्यापासून ते रणवीर सिंह आणि अनन्या पांडेपर्यंत अनेकांनी समाजमाध्यमांवर भावनिक पोस्ट शेअर करत अनंत अंबानी यांच्याप्रती आपला जिव्हाळा व्यक्त केला आहे.
-
शाहरुख खानने अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “अनंत अंबानी यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. आपण करत असलेले समाजोपयोगी कार्य आणि सकारात्मक विचार असेच पुढे चालू ठेवावेत. आपल्या कामातून लोकांच्या चेहऱ्यावर असेच हसू फुलवत राहा. ईश्वर आपल्याला उत्तम आरोग्य आणि सदैव सुख देवो.”
-
प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याने अनंत अंबानी यांचा उल्लेख ‘धाकटा भाऊ’ असा करत अत्यंत भावनिक शुभेच्छा दिल्या. त्याने म्हटले की, जगातील सर्वात निःस्वार्थी आणि दयाळू व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा! अनंत हा अनेकांसाठी प्रेरणेचा स्रोत आहे, तो भविष्यात देशाच्या प्रगतीसाठी मोठे योगदान देईल. त्याचे मन आणि विचार अत्यंत शुद्ध असून तो एक निर्मळ व्यक्ती आहे.
-
मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख याने अनंत अंबानी यांना शुभेच्छा देताना त्यांच्या ‘वंतारा’ या प्राणी सेवा उपक्रमाचे विशेष कौतुक केले. रितेशने म्हटले की, “तुम्हाला सुख आणि उत्तम आरोग्य लाभो. जेव्हा जेव्हा आम्ही वंताराला भेट देतो, तेव्हा आम्हाला खूप शांतता मिळते. तुम्ही आणि राधिका नेहमीच उत्तम आदरातिथ्य करता, तुमचा उत्साह सर्वांना प्रेरणा देणारा आहे.”
-
अभिनेता रणवीर सिंह याने अनंत अंबानी यांच्यासोबतचे आपले ऋणानुबंध अधोरेखित केले. त्याने अत्यंत आनंदी शैलीत अनंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
-
ज्येष्ठ अभिनेते संजय दत्त यांनी अनंत अंबानी यांच्यासोबतचे छायाचित्र प्रसिद्ध करत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी अनंत यांचा उल्लेख “सर्वात दयाळू आणि गोड स्वभावाचा भाऊ” असा केला.
-
अभिनेत्री अनन्या पांडेने अनंत अंबानींना आपला मोठा प्रेरणास्रोत मानले असून, एक चांगली व्यक्ती कशी असावी हे त्यांच्याकडून शिकायला मिळाल्याचे म्हटले आहे.
सावंतवाडी अन् दोडामार्ग तालुक्यात ‘किंग कोब्रा’चे दर्शन; निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण