-
माधुरी दीक्षितचे पती डॉ श्रीराम नेने हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.
-
श्रीराम नेने डॉक्टर असल्याने अनेकदा सोशल मीडियावरुनही ते आरोग्यासंबंधित माहिती देत असतात. तर याचमार्फत ते अनेकदा त्यांच्या दैनंदिन जीवनातील घडामोडीसुद्धा शेअर करत असतात.
-
डॉ नेने अनेकदा त्यांच्या कुटुंबीयांबरोबरचे फोटोसुद्धा पोस्ट करतात. अशातच आज Siblings day निमित्त त्यांनी त्यांच्या बहिणीबरोबरचे फोटो पोस्ट केले आहेत.
-
१० एप्रिल रोजी आज (शुक्रवारी) असलेल्या Siblings Dayनिमित्त त्यांनी त्यांची बहीण सीमा यांच्याबरोबरचे लहानपणीचे आणि खास फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
-
सीमा या श्रीराम नेने यांच्या लहान बहीण आहेत. यावेळी त्यांनी छान कॅप्शनसुद्धा दिली आहे.
-
आपल्या लहान बहिणीबद्दल ते यामधून म्हणाले, तू माझ्या आयुष्यात खूप आनंद आणतेस. माझी लहान बहीण सीमाबरोबरचे नातं मी कायम जपणार आहे.
-
श्रीराम नेने यांनी यापूर्वीसु्दधा अनेकदा त्यांच्या बहिणीबरोबरचे फोटो पोस्ट केले आहेत. ते सोशल मीडियावर कायमच त्यांची पत्नी माधुरी, दोन मुलं यांच्याबरोबरचे फोटोही पोस्ट करत असतात.
-
श्रीराम नेने यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते कार्डिओथोरॅसिक सर्जन असल्याचं त्यांच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे.
-
(सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
Photos: “मला तुझी मुलगी असल्याचा खूप अभिमान…”; अमृता फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुलगी दिविजा फडणवीसची भावूक पोस्ट