-
मराठी मनोरंजन सृष्टीसाठी गेल्या काही महिन्यांचा काळ लग्नसराईचा ठरला आहे. मात्र, यात विशेष चर्चा रंगली ती म्हणजे आपल्या भूतकाळातील कटू आठवणी मागे सारून प्रेमाला दुसरी संधी देणाऱ्या अभिनेत्रींची.
-
वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतारांनंतर ‘या’ अभिनेत्रींनी अत्यंत साधेपणाने आणि घरगुती वातावरणात आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे.
-
‘एलिझाबेथ एकादशी’ आणि ‘सहकुटुंब सहपरिवार’ यांसारख्या कलाकृतींतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नंदिता पाटकरने ६ एप्रिल २०२६ रोजी नाट्य दिग्दर्शक विपुल महागावकर यांच्याशी लग्नगाठ बांधली.
-
वयाच्या ४४ व्या वर्षी नंदिताने घेतलेला हा धाडसी आणि सकारात्मक निर्णय तिच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का ठरला.
-
‘रात्रीस खेळ चाले’ मधील ‘शेवंता’ या भूमिकेमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने यंदाच्या ‘व्हॅलेंटाईन डे’चे (१४ फेब्रुवारी २०२६) औचित्य साधत तनुज गोवळकर याच्याशी विवाह केला.
-
पहिल्या लग्नानंतर तब्बल ८ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर अपूर्वाने पुन्हा संसाराची गोड सुरुवात केली आहे.
-
‘संगीत देवबाभळी’ फेम अभिनेत्री शुभांगी सदावर्तेने डिसेंबर २०२५ मध्ये निर्माता सुमित म्हशेळकर याच्याशी लग्नाची गाठ बांधली.
-
विशेष म्हणजे, पहिल्या पतीपासून (आनंद ओक) घटस्फोट घेतल्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच शुभांगीने अत्यंत साध्या पद्धतीने सुमितसोबत आयुष्याची नवी सुरुवात केली.
-
अभिनेता अनिकेत विश्वासरावची पूर्वाश्रमीची पत्नी आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाणने नोव्हेंबर २०२४ मध्ये मानसबरोबर कोर्ट मॅरेज केले.
-
अनिकेतबरोबर झालेल्या वादानंतर स्नेहा बराच काळ चर्चेत होती, मात्र आता सर्व वाद मागे सारून ती आपल्या वैयक्तिक आयुष्यात आनंदाने स्थिरावली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मराठी अभिनेत्री/इन्स्टाग्राम)
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांची बदलीच्या ठिकाणी रूजू होण्यापूर्वी ‘पुन्हा बदली’! कोणत्या मंत्र्यांचा मुंढेंना विरोध? नाशिक कुंभमेळ्याची बदलीस किनार?