-
‘स्वराज्यरक्षक संभाजी’फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आपल्या अभिनयाने कायमच चाहत्यांच्या मनावर राज्य करत असते.
-
मराठी कलाविश्वात तिने आपल्या अष्टपैलू अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली असून ती लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
नुकतेच प्राजक्ताने सोशल मीडियावर तिचे काही नवीन फोटो शेअर केले असून तिच्या या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोंमध्ये प्राजक्ताने अतिशय सुंदर अशी पिवळ्या रंगाची भरजरी सिल्क साडी परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे.
-
साडीच्या या पारंपरिक लूकला साजेसा असा हेवी ज्वेलरीचा साज तिने केला असून गळ्यात चोकर आणि कानात मोठे झुमके घातले आहेत.
-
तिच्या हेअरस्टाईलने या लूकला अधिकच उठावदार बनवले असून केसांत माळलेल्या लांब गजऱ्याने तिच्या सौंदर्यात भर घातली आहे.
-
कपाळावर छोटी टिकली आणि चेहऱ्यावरील स्मितहास्य प्राजक्ताच्या या लूकला अधिकच प्रभावी बनवत आहे.
-
प्राजक्ताचा हा रॉयल आणि पारंपरिक अवतार सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
-
(सर्व फोटो साभार- प्राजक्ता गायकवाड इन्स्टाग्राम)
सारा तेंडुलकरने शेअर केले अर्जुनबरोबरचे खास फोटो; ‘सिबलिंग्स डे’निमित्त व्यक्त केले प्रेम