-
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे रविवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले.
-
थकवा आणि फुफ्फुसातील त्रासामुळे त्यांना ११ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
-
रविवारी अनेक अवयव निकामी झाल्याने आशा भोसलेंनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
-
काही महिन्यांपूर्वी अमृता राव यांच्या ‘Couple of Things’ या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आशा ताईंनी मधुबालाची एक आठवण सांगितली होती.
-
आशा भोसले म्हणालेल्या, एकदा ‘संगदिल’ चित्रपटाच्या गाण्याचे रेकॉर्डिंग करण्यासाठी आम्ही स्टुडिओमध्ये होतो.
-
त्यावेळी मधुबाला तिथे डान्सच्या कपड्यांमध्ये सराव करत होती.
-
आशाताई पुढे म्हणाल्या, जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मी थक्क झाले आणि मनात विचार आला की “हाय, इतकी सुंदर, ही कोण आहे?”
-
मधुबाला इतकी सुंदर होती की तिला पाहून माझ्या मनात विचार आला, “माझ्या मनात असा विचार येतोय, तर मग पुरुषांचं काय होत असेल?”
-
अशा प्रकारे आशा भोसलेंनी मधुबालाच्या अफाट सौंदर्याचे आणि त्यांच्यावर पडलेल्या प्रभावाचे वर्णन अतिशय प्रांजळपणे केले होते.
सारा तेंडुलकरने शेअर केले अर्जुनबरोबरचे खास फोटो; ‘सिबलिंग्स डे’निमित्त व्यक्त केले प्रेम