-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत (Pooja sawant) सध्या तिच्या ‘सालबर्डी’ (Salbardi) या आगामी चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे.
-
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पूजाने नुकतेच तिचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या खास फोटोंमध्ये पूजाने पिवळ्या रंगाचा लखनवी कुर्ता आणि निळी डेनिम जीन्स परिधान केल्याचे दिसत आहे.
-
या लूकवर तिने मोठे ऑक्सिडाइज्ड झुमके आणि हातात सुंदर बांगड्या, असा पेहराव केला आहे.
-
मोकळे केस आणि हलका मेकअप करीत पूजाने आपला हा मोहक लूक पूर्ण केला आहे.
-
हे फोटो शेअर करताना तिने ‘Following the path of destiny’, अशी कॅप्शन दिली आहे.
-
पूजा नुकतीच ‘सखे गं साजनी’ या चित्रपटात प्रार्थना बेहेरे आणि अभिजीत खांडकेकर यांच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.
-
आता पुन्हा एकदा ती ‘सालबर्डी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: पूजा सावंत/इन्स्टाग्राम)
सारा तेंडुलकरने शेअर केले अर्जुनबरोबरचे खास फोटो; ‘सिबलिंग्स डे’निमित्त व्यक्त केले प्रेम