-
‘झी मराठी’च्या ‘तुला जपणार आहे’ या थ्रिलर मालिकेमुळे अभिनेत्री महिमा म्हात्रे आता घराघरांत लोकप्रिय झाली आहे. तिने यामध्ये मीरा ही भूमिका साकारली आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या मीराने नुकतीच तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.
-
महिमा म्हात्रेचा साखरपुडा नुकताच पार पडला असून याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
महिमाचा साखरपुडा झाल्याची आनंदाची बातमी पाहून तिच्या सर्वच चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.
-
यामध्ये तिचा होणारा नवरा गुडघ्यावर बसून महिमाच्या हातात अंगठी घालत असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
साखरपुड्यात सुरुवातीला अभिनेत्रीने हिरवी साडी नेसून पारंपरिक लूक होता. त्यानंतर महिमाने बेबी पिंक रंगाचा डिझायनर गाऊन घातला होता. या दोन्ही इंडो-वेस्टर्न लूकमध्ये ती खूपच गोड दिसत होती.
-
महिमा म्हात्रेच्या होणाऱ्या पतीचं नाव आहे रोशन विचारे.
-
रोशन सुद्धा अभिनेता आहे, आजवर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये रोशनने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘खरंच तिचं काय चुकलं’, ‘दार उघड बये’, ‘तुझं माझं जमतंय’, ‘स्वराज्य जननी जिजामाता’ अशा अनेक मालिकांमध्ये रोशन झळकला आहे.
-
“We Are Happily Engaged” हे कॅप्शन अभिनेत्रीने साखरपुड्याच्या फोटोंना दिलं आहे.
-
दरम्यान, संपूर्ण कलाविश्वातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. यासह महिमाच्या ‘तुला जपणार आहे’ या मालिकेला रात्री उशिरा प्रसारित होऊनही चांगला टीआरपी मिळतोय. ( सर्व फोटो सौजन्य : महिमा म्हात्रे व रोशन विचारे इन्स्टाग्राम )
SRH vs RR: “हा पुरस्कार मी…”, स्वप्नवत पदार्पण करणाऱ्या प्रफुल हिंगेने सामनावीर अवॉर्ड कोणाला समर्पित केला? सामन्यानंतर म्हणाला…