-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) सध्या तिच्या अभिनयाबरोबरच स्टायलिश लूकमुळेही चर्चेत आहे.
-
नुकतीच तिची ‘हे काय नवीन?’ (Hey Kay Navin) ही बहुप्रतिक्षित वेबसीरिज ३१ मार्च रोजी ‘झी ५’ (ZEE5) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली.
-
वाढत्या उन्हाळ्याचा विचार करून प्रियाने पांढऱ्या रंगाचा लिनन टॉप आणि निळ्या रंगाचा लिनन स्कर्ट असा कुल अवतार परिधान केला आहे.
-
विशेष म्हणजे प्रियाने परिधान केलेला हा पेहराव तिचा आणि तिची बहीण श्वेता बापट यांचा कपड्यांचा ब्रँड ‘सावेंची’ (Savenchi) मधील आहे.
-
वरुण नार्वेकर दिग्दर्शित ‘हे काय नवीन?’ मध्ये प्रियाबरोबर तिचा पती आणि अभिनेता उमेश कामत मुख्य भूमिकेत आहे.
-
प्रियाने नाटक, चित्रपट आणि वेबसीरिज अशा तिन्ही माध्यमांत आपला ठसा उमटवला आहे.
-
सध्या ही जोडी ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाद्वारे रंगभूमीवर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रिया बापट/इन्स्टाग्राम)
“माझ्या बायकोची जात वेगळी आहे”, घरी गणपती बसवल्याने झालेला वाद, भाऊ कदम म्हणाले, “आमचे बौद्ध बांधव…”