-
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आज त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा करत आहेत.
-
या खास निमित्ताने आलियाने इन्स्टाग्रामवर त्यांच्या सुट्यांचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
हे जोडपे सध्या एका अज्ञात ठिकाणी सुट्यांचा आनंद घेत असून, फोटोंमध्ये ते बर्फाळ भागात स्किईंग करताना दिसत आहेत.
-
फोटो शेअर करताना आलियाने लिहिले की, “somewhere between gliding and falling, walking and a lot of talking…. we made ourselves a pretty wonderful life In short ..Tu saath hain toh din raat hain” (कधी घसरलो तर कधी सावरलो, कधी चाललो तर कधी खूप गप्पा मारल्या… असंच काहीसं करत आम्ही आमचं आयुष्य खूप सुंदर बनवलं आहे.)
-
या सहलीत त्यांची मुलगी राहादेखील त्यांच्यासोबत असून, एका फोटोत तिची झलक पाहायला मिळते.
-
रोमँटिक सुट्यांची मजा घेत असताना या जोडीने कॉफीचा आनंद घेतानाचा एक फोटोही पोस्ट केला आहे.
-
आलियाने त्यांच्या डिनरचा एक खास फोटो शेअर केला असून, त्यात मेणबत्ती, गुलाब आणि ब्रेड दिसत आहे.
-
या पोस्टच्या शेवटी आलियाने एका गोंडस ‘अल्पाका’ प्राण्याचा फोटो शेअर करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
(सर्व फोटो साभार- आलिया भट्ट इन्स्टाग्राम)
“माझ्या बायकोची जात वेगळी आहे”, घरी गणपती बसवल्याने झालेला वाद, भाऊ कदम म्हणाले, “आमचे बौद्ध बांधव…”