-
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना अमृता खानविलकर ही नेहमीच आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकत असते.
-
मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अमृता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
नुकतेच अमृताने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर काही सुंदर फोटो शेअर केले असून ते सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
-
या फोटोंमध्ये अमृताने आकाशी रंगाची अतिशय मोहक आणि पारंपरिक साडी परिधान केल्याचे दिसून येत आहे.
-
तिच्या या साडीवर सोनेरी रंगाची जरीकाम केलेली बॉर्डर असून त्यावर नाजूक फुलांची नक्षी उठून दिसत आहे.
-
या लूकला पूर्ण करण्यासाठी तिने गळ्यात जड आणि ठसठशीत दागिन्यांची निवड केली असून त्यात मोत्यांचे काम उठून दिसत आहे.
-
कानात मोठे झुमके आणि नाकात पारंपरिक नथ घालून तिने तिच्या सौंदर्याला मराठमोळा साज चढवला आहे.
-
तिच्या या नखरेल अदा आणि मोहक लूकवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत तिला दाद दिली आहे.
-
(सर्व फोटो साभार- अमृता खानविलकर इन्स्टाग्राम)
“माझ्या बायकोची जात वेगळी आहे”, घरी गणपती बसवल्याने झालेला वाद, भाऊ कदम म्हणाले, “आमचे बौद्ध बांधव…”