-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम सध्या घराघरांत लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
-
उत्कृष्ट लेखन, कलाकारांचे भन्नाट सादरीकरण आणि विनोदाचे अचूक टायमिंग यांमुळे या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.
-
या कार्यक्रमातील लोकप्रिय अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) आपल्या अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
-
अलीकडेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या संपूर्ण टीमने आपला ऑस्ट्रेलिया दौरा यशस्वीपणे पूर्ण केला.
-
या दौऱ्यादरम्यान शिवालीने सिडनीतील प्रसिद्ध ‘ऑपेरा हाऊस’ परिसरात एक खास फोटोशूट केले.
-
या फोटोशूटसाठी शिवालीने पांढऱ्या रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला असून, तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना शिवालीने ‘EveryThing Is Perfect’ असे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)
“माझ्या बायकोची जात वेगळी आहे”, घरी गणपती बसवल्याने झालेला वाद, भाऊ कदम म्हणाले, “आमचे बौद्ध बांधव…”