-
‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत मोठा ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळत आहे. सावली व सारंग यांच्यात दुरावा आला आहे.
-
सावली तिच्या मुलाबरोबर वेगळी राहते. तर, सारंगजवळ त्यांची मुलगी आहे.
-
मालिकेत बालकलाकार साईराज केंद्रे व वेदांती भोसले यांची एन्ट्री झाली आहे.
-
साईराज याआधी अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत दिसला होता. याबरोबरच, नुकताच तो क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या सिनेमातही दिसला होता.
-
तर, वेदांती भोसले ड्रामा ज्युनिअर्स या शोमध्ये दिसली होती.
-
दोन्ही बालकलाकार सोशल मीडियावरील रील्सच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करतात. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे.
-
आता साईराजने अभिनेत्री प्राप्ती रेडकर म्हणजेच सावळ्याची जणू सावली मालिकेतील सावलीबरोबर काही फोटो शेअर केले आहेत.
-
हे फोटो शेअर करताना त्याने सावली आई अशी कॅप्शन दिली आहे.
-
त्यांचे हे फोटो लक्ष वेधून घेत आहेत. नेटकरी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. ( सर्व फोटो सौजन्य: प्राप्ती रेडकर व साईराज केंद्रे इन्स्टाग्राम)
Photos: बारामतीच्या बागेत युगेंद्र पवार यांच्या पत्नीचं फोटोशूट; जांभळ्या साडीतील सौंदर्याने वेधले लक्ष