-
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत सध्या तिच्या ‘सालबर्डी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
पूजाने ‘सालबर्डी’मधील तिच्या आगामी गाण्याचा जबरदस्त लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
हातात बंदूक आणि काळ्या रंगाचा कोट अशा तिच्या आक्रमक फोटोंची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
-
काळा टॉप, ऑक्सिडाइज्ड हार आणि हातात ब्रेसलेट घालून तिने आपला हा लूक पूर्ण केला आहे.
-
या चित्रपटात पूजा ‘पी.आय. मनोरमा प्रधान’ या पोलीस अधिकाऱ्याची मुख्य भूमिका साकारत आहे.
-
पूजाने हे फोटो शेअर करताना ‘PI MANORAMA PRADHAN is waiting for you’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
पूजाचा हा नवा अवतार पाहिल्यानंतर तिच्या आगामी गाण्याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
-
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पूजा सातत्याने तिचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर करीत असते.
-
(सर्व फोटो साभार- पूजा सावंत इन्स्टाग्राम)
“माझ्या बायकोची जात वेगळी आहे”, घरी गणपती बसवल्याने झालेला वाद, भाऊ कदम म्हणाले, “आमचे बौद्ध बांधव…”