-
लोकप्रिय टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी सध्या त्याच्या एका खास गुंतवणुकीमुळे चर्चेत आहे.
-
अर्जुनने निसर्गरम्य कर्जत मध्ये एक आलिशान फार्म हाऊस विकत घेतले आहे.
-
या घराचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
-
धावपळीच्या मुंबईपासून दूर, शांततेत वेळ घालवण्यासाठी अर्जुनने कर्जतमध्ये फार्म हाऊस घेतले.
-
अर्जुनच्या या फार्म हाऊसचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तेथील ‘व्हाइट आणि मल्टिकलर कार्पेट थीम’.
-
घराच्या भिंती आणि फर्निचरसाठी पांढऱ्या रंगाचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे घराला एक अतिशय प्रसन्न आणि आधुनिक लूक मिळतो.
-
या पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर विविध रंगांच्या कार्पेट्सनी घराची शोभा अधिकच वाढवली आहे.
-
हे रंगीबेरंगी कार्पेट्स घराला एक ‘व्हायब्रंट’ आणि घरगुती फिल देतात, ज्यामुळे नेटकऱ्यांचे लक्ष या थीमने वेधून घेतले आहे.
-
अर्जुनने शेअर केलेल्या फोटोंमध्ये घराचे प्रशस्त हॉल, लाकडी कामाचा सुबक वापर आणि सभोवतालची हिरवळ स्पष्टपणे दिसून येते.
-
घराच्या बाहेरील बाजूस एक सुंदर स्विमिंग पूल आणि बसण्यासाठी मोठी जागा आहे.
-
सुट्यांचा आनंद घेण्यासाठी हे फार्म हाऊस एक परिपूर्ण ठिकाण असल्याचे दिसते.
-
(फोटो- अर्जुन बिजलानी इन्स्टाग्राम)
दोनदा फेरमतमोणी, वीज गायब, भाजपचे चंद्रशेखर कदम २३ मतांनी विजयी… राहुरीतील २८ वर्षांपूर्वीच्या पोटनिवडणुकीतील थरार