-
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मिथिला पालकर (Mithila Palkar) सध्या तिच्या बहुचर्चित ‘भूत बंगला’ (Bhooth Bangla Movie) या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
हा चित्रपट आज, १७ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला असून, या खास प्रसंगी मिथिलाने चित्रपटाच्या सेटवरील काही निवडक आणि पडद्यामागचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या चित्रपटाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे याची तगडी स्टारकास्ट. यात मिथिलाबरोबरच खिलाडी अक्षय कुमार, दिग्गज अभिनेत्री तब्बू, विनोदाचे बादशाह असरानी, राजपाल यादव आणि परेश रावल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
-
विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि तब्बू ही जोडी तब्बल २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे.
-
हॉरर-कॉमेडी जॉनर असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी केले आहे.
-
अक्षय कुमार आणि एकता कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रियदर्शन आणि अक्षय यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाली आहे.
-
‘भूत बंगला’ चित्रपटाचे शूटिंग ज्या ठिकाणी झाले, त्याच ठिकाणी २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट ‘भूल भुलैया’ चित्रपटाचेही चित्रीकरण करण्यात आले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : मिथिला पालकर/इन्स्टाग्राम)
मोरासमोर फणा पसरुन उभा राहिला भलामोठा किंग कोब्रा, दोन शत्रुंमध्ये पुढे काय घडलं? पाहा धडकी भरवणारा VIDEO