-
आपल्या विनोदी टायमिंगने अख्ख्या महाराष्ट्राला हसवणारा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) फेम अभिनेता गौरव मोरे (Gaurav More) सध्या यशाच्या शिखरावर आहे.
-
नुकतेच गौरवचे एक नवीन फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
-
हे फोटोशूट गौरवने त्याच्या नव्या हक्काच्या घरात केले आहे.
-
गौरव आज जरी स्टार असला, तरी इथवर पोहोचण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे.
-
पवईतील म्हाडा लॉटरीत गौरवला घर लागले आणि मेहनतीच्या जोरावर त्याने स्वतःचे स्वप्न पूर्ण केले.
-
नुकताच त्याने पत्नी आणि अभिनेत्री प्रियांका कारेकर (Priyanka Karekar) व कुटुंबीयांसह नव्या घरात गृहप्रवेश केला.
-
या फोटोशूटमध्ये गौरवने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला असून त्याचा लूक अत्यंत छान दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौरव मोरे/इन्स्टाग्राम)
“धुरंधर २ मधील दाऊदचं चित्रण चुकीचं,” दाऊद इब्राहिममुळे घर चालतंय म्हणणाऱ्या दिग्दर्शकाचे विधान; म्हणाले, “त्याची प्रकृती…”