-
झी मराठी वाहिनीवरील ‘तारिणी’ (Tarini TV Serial) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली असून लोकप्रियतेचे नवनवीन शिखरे सर करत आहे.
-
या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) सध्या आपल्या लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
-
शिवानीने नुकतेच तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये शिवानीने परिधान केलेल्या पिवळ्या रंगाच्या साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोंना शिवानीने ‘April Is Officially YELLOWING’ असे हटके कॅप्शन दिले आहे.
-
विशेष म्हणजे, या फोटोंमध्ये शिवानीबरोबर मालिकेतील तिचा सहकलाकार स्वराज नागरगोजे (Swaraj Nagargoje) देखील दिसत असून दोघांनीही दिलेली केमिस्ट्री चाहत्यांना भावली आहे.
-
शिवानीच्या या फोटोंवर अभिनेत्री अभिज्ञा भावेने (Abhidnya Bhave) कमेंट करत प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी सोनार/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेचे नव्या घरातील फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल)
‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ दया नायक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; उद्धव ठाकरेंसह बॉलिवूडच्या दिग्गजांची मांदियाळी!