-
गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम आज प्रत्येक मराठी कुटुंबाचा अविभाज्य भाग बनला आहे.
-
या कार्यक्रमातील आपल्या विनोदी टायमिंग आणि अभिनयाने अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने (Priyadarshini Indalkar) अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
-
प्रियदर्शिनी सध्या तिच्या एका हटके फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
-
सोशल मीडियावर प्रियदर्शिनीने शेअर केलेल्या नव्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोंमध्ये प्रियदर्शिनीने काळ्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला आहे.
-
या फोटोंना प्रियदर्शिनीने ‘Black Swan’ असे हटके कॅप्शन दिले आहे.
-
केवळ छोट्या पडद्यावरच नाही, तर प्रियदर्शिनीने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्येही स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रियदर्शिनी इंदलकर/इन्स्टाग्राम)
‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ दया नायक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; उद्धव ठाकरेंसह बॉलिवूडच्या दिग्गजांची मांदियाळी!