-
सोनाली कुलकर्णी मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम केलं आहे.
-
सोनाली कुलकर्णी अलीकडेच आलेल्या ‘तिघी’ या चित्रपटातून झळकली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
-
सोनाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी ती शेअर करत असते.
-
सोनाली अशातच अक्षय तृतीयाच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर पारंपरिक अंदाजातील खास फोटो शेअर केले आहेत.
-
सोनालीने राखाडी रंगाच्या साडीमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना तिने ‘अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
सोनालीने यावेळी सुंदर प्लेन राखाडी रंगाची साडी नेसली आहे. जिला निळ्या रंगाची बॉर्डर आहे. यावर तिने निळ्या रंगाचा नक्षीदार ब्लाऊज परिधान केला आहे.
-
सोनालीने या राखाडी रंगाच्या आकर्षक साडीवर डिझायनर दागिने परिधान केले आहेत. गळ्यात सुंदर असा चोकर आणि कानामध्ये त्यावर साजेसे कानातले परिधान केले आहेत.
-
सोनालीने सिंपल मेकअप केला असून त्यावर निळ्या रंगाची टिकली लावली आहे. शेवटी अभिनेत्रीने यावेळी केसांमध्ये गजरा माळत हा लूक पूर्ण केला आहे.
-
(सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ दया नायक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; उद्धव ठाकरेंसह बॉलिवूडच्या दिग्गजांची मांदियाळी!