-
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री भाग्यश्री लिमये सध्या चर्चेत आहे.
-
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने भाग्यश्रीने खास मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
-
या खास प्रसंगासाठी तिने गडद जांभळ्या रंगाची (Plum/Wine) काठपदराची साडी नेसून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
-
या लूकवर तिने मोत्याची नथ आणि सोन्याचे पारंपरिक दागिने घालून सौंदर्याला अधिक उजाळा दिला आहे.
-
कपाळावर छोटीशी चंद्रकोर आणि साधेपणा तिला एका अस्सल मराठी सुवासिनीचा लूक देत आहे.
-
पारंपरिक साडीसोबत तिने स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान करून या लूकला एक मॉडर्न टच दिला आहे.
-
भाग्यश्रीचे हे साडीतील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यावर लाइक्सचा पाऊस पडत आहे.
-
‘घाडगे अँड सून’मधून घराघरांत पोहोचलेली भाग्यश्री आता ओटीटी आणि हिंदी प्रोजेक्ट्समध्येही सक्रिय आहे.
-
(सर्व फोटो साभार- भाग्यश्री लिमये इन्स्टाग्राम)
‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ दया नायक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; उद्धव ठाकरेंसह बॉलिवूडच्या दिग्गजांची मांदियाळी!