-
यूट्यूबर आणि गायिका स्वानंदी सरदेसाई लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरपैकी एक आहे.
-
स्वानंदी तिच्या यूट्यूब चॅनेलमार्फत कोकणातील निसर्ग, परंपरा आणि दैनंदिन जीवनासंदर्भातील व्हिडीओ व फोटो पोस्ट करत असते. तिचा मोठा फॅन फॉलोइंग आहे.
-
स्वानंदीने अशातच एक गूड न्यूज दिली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत ती लग्नबंधनात अडकल्याची आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांसह शेअर केली आहे.
-
यावेळी तिने लग्नाच्या लूकमधील पतीबरोबरचा फोटो शेअर करत त्याला “श्री. व सौ.अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर : १९-०४-२०२६” अशी कॅप्शन दिली आहे.
-
स्वानंदीने रविवारी १९ एप्रिल रोजी लग्न केल्याचं माहिती यामधून दिली आहे. स्वानंदीच्या पतीचं नाव विक्रांत रामदास असं आहे.
-
स्वानंदीने लग्नासाठी पारंपरिक लूक केला. तिने यावेळी हिरव्या रंगाची प्लेन नऊवारी साडी नेसली. जिला सोनेरी नक्षीदार बॉर्डर आहे. यावर तिने सोनेरी रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.
-
हातात हिरवा चुडा, गळ्यात चिचंपेटी आणि तनमणी आणि नाकात नथ असे दागिने परिधान केले आहेत. कानात झुमके आणि गळ्यात नाजूक मंगळसूत्रसुद्धा पाहायला मिळत आहे. स्वानंदीने चंद्रकोर लावत लूक पूर्ण केला.
-
स्वानंदीच्या पतीने पांढऱ्या रंगाचं धोतर, सदरा आणि शेला परिधान करत पारंपरिक लूक केला. दोघांनी लग्नासाठी पारंपरिक लूकला पसंती दिल्याचं यामधून दिसतं.
-
स्वानंदीने शेअर केलेल्या या फोटोमधून या जोडीने साध्या आणि पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने लग्न केल्याचं दिसतं.
-
रम्यान, स्वानंदी मीडिया इन्फ्लुएन्सर असण्याबरोबर गायिकासुद्धा आहे. तिने अलीकडेच आलेल्या ‘दशावतार’ या लोकप्रिय चित्रपटासाठी गाणं गायलं होतं. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ दया नायक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; उद्धव ठाकरेंसह बॉलिवूडच्या दिग्गजांची मांदियाळी!