-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नशिबवान’ (Nasheebvan TV Serial) ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून यातील कलाकारांच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री सोनाली खरे (Sonali Khare) ‘उर्वशी’ या नकारात्मक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
-
तब्बल १० वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर सोनालीने मालिका विश्वात केलेले हे पुनरागमन अत्यंत दमदार ठरले आहे.
-
आपल्या व्यस्त चित्रीकरणातून वेळ काढत सोनाली सध्या आपली लेक सनाया आनंदसह (Sanayaah Anand) कोकण दौऱ्यावर आहे.
-
रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गरम्य गुहागरमध्ये (Guhagar) हा माय-लेकीचा सफरनामा सुरू आहे.
-
गुहागरचा समुद्रकिनारा पांढऱ्या शुभ्र वाळूसाठी आणि शांत लाटांसाठी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.
-
सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि अथांग समुद्र यांचा संगम असल्याने येथे निसर्गाची अनोखी रूपे पाहायला मिळतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली खरे/इन्स्टाग्राम)
१ नंबर! विद्यार्थ्यांसह शिक्षिकेने धरला ठेका, ‘मुकाबला’वर केला जबरदस्त डान्स; पाहा VIDEO