-
अभिनेत्री रूपल नंदने नुकतेच तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, तिच्या रूपाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
-
तिच्या या ताज्या फोटोंमध्ये ती हिरव्या आणि लाल रंगाच्या पारंपरिक काठपदराच्या साडीत अतिशय मोहक दिसत आहे.
-
या लूकला अधिक आकर्षक बनविण्यासाठी तिने गळ्यात मोती आणि काळे मणी असलेले मंगळसूत्र परिधान केले आहे.
-
नाजूक कानातले आणि हातातील हिरव्या बांगड्या तिच्या या पारंपरिक लूकला पूर्ण करत आहेत.
-
या फोटोंना तिने ‘Mann Oogach hase gaalat!’ अशी खास कॅप्शन दिली आहे.
-
अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी रूपल सध्या ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेत काम करत आहे.
-
याआधी तिने ‘गोठ’ आणि ‘श्रीमंत घरची सून’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती.
-
प्रेक्षक सध्या तिच्या अभिनयासोबतच तिच्या या मराठमोळ्या सौंदर्यावरही फिदा झाले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: रूपल नंद/इन्स्टाग्राम)
Photos : सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या लग्नाची पहिली पत्रिका देवाचरणी; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत बाप्पा आणि देवीला आमंत्रण!