-
शनिवारी १८ एप्रिल रोजी ओडिसा येथे झालेल्या ६१ व्या ‘फेमिना मिस इंडिया २०२६’ च्या ग्रँड फिनालेमध्ये साध्वी सतीश सैल ही ‘मिस इंडिया वर्ल्ड २०२६’ची विजेती ठरली.
-
‘मिस इंडिया वर्ल्ड २०२६’च्या अंतिम फेरीत तीन स्पर्धक होत्या. यामध्ये गोव्याची साध्वी सतीश सैल, महाराष्ट्राची राजनंदिनी पवार आणि जम्मू काश्मीरची श्री अद्वैता यांचा समावेश होता.
-
या तिघींनी कठीण प्रश्नोत्तर फेरीत आत्मविश्वास, बुद्धिमत्ता आणि शांत स्वभावाने लक्ष वेधलं.
-
राजनंदिनी स्पर्धेत फर्स्ट रनर-अप ठरली तर तर जम्मू काश्मीरची श्री अद्वैता हिला सेकंड रनर-अपचा किताब मिळाला
-
गोव्यामध्ये राहणारी साध्वी सतीश सैल ही मॉडेल आणि उद्योजिका आहे. तिने अनेक फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला आहे. तसेच California Burrito सारख्या ब्रँडचा चेहराही ती राहिली आहे.
-
याशिवाय, तिने बांधकाम आणि विकास क्षेत्रातील एका कंपनीची सह-स्थापना केली आहे.
-
आपल्या विजयानंतर आनंद व्यक्त करत साध्वीने ही संधी मिळाल्याबद्दल आभार मानले.
-
एएनआयशी बोलताना ती म्हणाली, “हा क्षण अजूनही खरा वाटत नाहीये. मला ही संधी मिळाली यासाठी मी खूप आभारी आहे.”
-
(सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
Photos : सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या लग्नाची पहिली पत्रिका देवाचरणी; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत बाप्पा आणि देवीला आमंत्रण!