-
मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) सध्या तिच्या एका खास लूकमुळे चर्चेत आहे.
-
केवळ अभिनयच नव्हे, तर आपल्या बहारदार नृत्याने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अमृता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.
-
नेहमीच स्टायलिश अंदाज आणि साड्यांच्या नवनवीन कलेक्शनमुळे चर्चेत राहणाऱ्या अमृताने नुकतेच ‘फिल्मफेअर राउंडटेबल’ कार्यक्रमासाठी खास फोटोशूट केले आहे.
-
अमृताने या खास सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून तिच्या लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.
-
अमृताने या कार्यक्रमासाठी फिकट निळ्या रंगाचा स्टायलिश ड्रेस परिधान केला आहे.
-
या हटके लूकवर अमृताने अत्यंत मोजक्या पण उठावदार दागिन्यांची निवड करून आपला ‘सिंपल लूक’ अधिक आकर्षक बनवला आहे.
-
या फोटोंवर चाहत्यांनी अवघ्या काही वेळातच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता खानविलकर/इन्स्टाग्राम)
Photos : सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या लग्नाची पहिली पत्रिका देवाचरणी; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत बाप्पा आणि देवीला आमंत्रण!