-
मराठी मालिकाविश्वातील अनेक ऑनस्क्रीन कपल अलीकडे लग्नबंधनात अडकले. अशातच आता टेलिव्हिजनवरील अजून एका लोकप्रिय जोडीने गुड न्यूज दिली आहे. लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का सरकटे व अभिनेता निखिल चव्हाण यांचं लग्न ठरलं आहे.
-
‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘कारभारी लयभारी’मध्ये अनुष्का व निखिल यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. मालिकेतील दोघांच्या जोडीला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.
-
अशातच आता खऱ्या आयुष्यातसुद्धा ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच अनुष्का व निखिल यांचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला आहे.
-
राजकीय नेते विनोद पाटील यांनी अनुष्का व निखिल यांचं लग्न ठरल्याची बातमी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत दिली आहे.
-
यावेळी त्यांनी या व्हिडीओला, “आमच्या भाची अनुष्का सरकटे आणि लोकप्रिय मराठी अभिनेता निखिल चव्हाण यांचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला आहे. ते दोघे ‘करभारी लयभारी’ या झी मराठीवरील मालिकेत झळकले होते. हा खास क्षण साजरा करण्यासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र जमलं आणि हा आनंदाचा सोहळा अधिक सुंदर बनवला. या गोड जोडप्याला पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. प्रेम, आनंद आणि सुखी प्रवास लाभो ”
-
अनुष्का व निखिल यांच्या सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाला माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व त्याचे पुत्र संतोष रावसाहेब दानवे उपस्थित होते.
-
अनुष्का व निखिल यांचा कुटुंबीयांच्या आणि राजकीय नेते मंडळींच्या साक्षीने सुपारी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला.
-
सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमासाठी अनुष्काने लाल रंगाची साडी नेसली असून त्यावर लाल रंगाच्या बांगड्या आणि गळ्यात डिझायनर डायमंडचा नेकलेस परिधान केला आहे.
-
निखिलने निळ्या रंगाचं शर्ट आणि काळी पँट परिधान केली आहे. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
Photos : सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या लग्नाची पहिली पत्रिका देवाचरणी; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत बाप्पा आणि देवीला आमंत्रण!