-
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेमुळे अभिनेता विजय आंदळकर घराघरांत लोकप्रिय झाला आहे. त्याने या मालिकेत साकारलेल्या पात्राचं नाव आहे पार्थ देशमुख. आज आपण पार्थच्या खऱ्या आयुष्यातील काव्याबद्दल जाणून घेऊयात. विजयच्या पत्नीचं नाव आहे रुपाली झनकर.
-
रुपाली सुद्धा मराठी कलाविश्वात सक्रिय आहे. ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू’ या मालिकेत विजय-रुपाली एकत्र झळकले होते. याच मालिकेच्या सेटवर रुपाली विजयच्या प्रेमात पडली होती.
-
विजय आणि रुपालीच्या वयात १२ वर्षांचं अंतर आहे. रुपाली याबद्दल सांगते, “वर्तुळ मालिकेपासून मला विजयचं काम आवडत होतं…तेव्हा मी कॉलेजमध्ये होते. आमच्यात १२ वर्षांचं अंतर आहे. पण, आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही.”
-
“मालिकेत एकत्र काम करताना मला तो खूप आवडू लागला. मी त्याला आधी अरेतुरे बोलायचे…सेटवर इतरांना मी मालिकेत जी त्यांची नावं आहेत त्यानुसार आवाज द्यायचे. एक दिवस मी याला ‘अहो’ म्हणून हाक मारली…त्यावेळी त्याने जो लूक दिला…ते पाहून मला छान वाटलं. त्यानंतर हळुहळू आम्ही बोलायला लागलो” असं रुपालीने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
-
दोघांची छान मैत्री झाल्यावर आईच्या सांगण्यावरून विजयने रुपालीला लग्नाची मागणी घातली होती.
-
यानंतर विजय-रुपालीचा लग्नसोहळा लॉकडाऊनच्या काळात पार पडला.
-
या जोडप्याला गोंडस मुलगी सुद्धा आहे. तिचं नाव आहे मायरा.
-
लग्नाला ५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय अन् त्याच्या पत्नीने खास फोटोशूट केलं आहे.
-
“एकमेकांसाठी अनोळखी ते आयुष्यभराचे जोडीदार…५ वर्षे झाली आणि अजूनही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे रुपाली” असं कॅप्शन विजयने या फोटोंना दिलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : विजय आंदळकर इन्स्टाग्राम )
Photos : सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या लग्नाची पहिली पत्रिका देवाचरणी; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत बाप्पा आणि देवीला आमंत्रण!