-
World Earth Day 2026: दरवर्षी २२ एप्रिल रोजी जगभरात ‘जागतिक वसुंधरा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
-
पर्यावरणाचे रक्षण करणे आणि पृथ्वी वाचवण्यासाठी जनसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे.
-
पहिला वसुंधरा दिन २२ एप्रिल १९७० रोजी साजरा करण्यात आला होता.
-
आज जगभरातील १९० हून अधिक देश या मोहिमेत सहभागी होतात.
-
याच निमित्ताने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री श्रिया पिळगांवकरने (Shriya Pilgaonkar) सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
श्रियाने निसर्गाच्या सानिध्यातील सुंदर फोटो शेअर करत वसुंधरा दिनाचे महत्त्व पटवून दिले आहे.
-
श्रियाने आपल्या पोस्टला एक अतिशय अर्थपूर्ण कॅप्शन दिले आहे. “आपली पृथ्वी आपल्याकडून फार काही मागत नाही. फक्त इतकंच की, आपण तिचं ऐकावं, आपला वेग थोडा कमी करावा आणि पुन्हा तिच्याकडे वळावं…”
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रिया पिळगांवकर/इन्स्टाग्राम)
१ नंबर! विद्यार्थ्यांसह शिक्षिकेने धरला ठेका, ‘मुकाबला’वर केला जबरदस्त डान्स; पाहा VIDEO