-
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ (Lagnanantar Hoilach Prem TV Serial) सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
या मालिकेत ‘काव्या’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने (Dnyanada Ramtirthkar) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
नुकतेच ज्ञानदाने इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले असून, तिच्या हटके लूकची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
-
निमित्त होते ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२६’ (Star Pravah Parivaar Puraskar 2026) सोहळ्याचे.
-
या दिमाखदार सोहळ्यासाठी ज्ञानदाने एका सुंदर गडद लाल रंगाच्या साडीची निवड केली होती.
-
मात्र, केवळ साडीच नाही तर ती नेसण्याची तिची स्टाईल अतिशय वेगळी होती.
-
ज्ञानदा लवकरच विवाहबंधनात अडकणार असून, काही दिवसांपूर्वीच तिचे केळवण थाटामाटात पार पडले.
-
(सर्व फोटो सौजन्य : ज्ञानदा रामतीर्थकर/इन्स्टाग्राम)
१ नंबर! विद्यार्थ्यांसह शिक्षिकेने धरला ठेका, ‘मुकाबला’वर केला जबरदस्त डान्स; पाहा VIDEO