-
सखी गोखलेने पती सुव्रत जोशीच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर एक विशेष पोस्ट शेअर केली आहे.
-
सखीने सुव्रतसोबतचे काही सुंदर आणि रोमँटिक फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
“माझ्यासाठीच खास बनवून या ग्रहावर पाठवलेल्या माणसाला वाढदिवसाच्या आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या उशिरा शुभेच्छा! आपण एकत्र जग पाहिलंय असं म्हणण्यापासून आपण फक्त एक खंड लांब आहोत आणि या वेड्या साहसी प्रवासात मला तुझ्याशिवाय दुसरं कोणीही नको होतं! तू ज्या पद्धतीने दयाळूपणाने आणि बालसुलभ कुतूहलाने आयुष्य जगत आहेस, ते पाहणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. तूच माझं घर आहेस; आपलं आयुष्य नेहमी प्रेम, विनोद, मैत्री, प्रवास, नाटक, चांगलं जेवण आणि पुस्तकांनी भरलेलं असावं, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे!” अशी कॅप्शन तिने दिली आहे.
-
‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेच्या सेटवर या दोघांची पहिली भेट झाली होती.
-
या जोडीने ११ एप्रिल २०१९ रोजी विवाहबंधनात अडकून आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली.
-
सुव्रतच्या वाढदिवसासोबतच सखीने त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्याही उशिरा शुभेच्छा दिल्या आहेत.
-
सुव्रत हा माझ्यासाठी घर असून त्याच्यासोबत जग फिरणे हा एक सुंदर प्रवास असल्याचे सखीने म्हटले आहे.
-
सोशल मीडियावर सखी आणि सुव्रतच्या या जोडीवर चाहत्यांकडून सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो साभार- सखी गोखले इन्स्टाग्राम)
नाना पाटेकर यांच्याबद्दल विचारल्यानंतर राखी सावंतने एका शब्दात दिलं उत्तर, तर आमिर खानला विचारला ‘हा’ प्रश्न; म्हणाली…