-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) हिने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
-
प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि आपल्या चाहत्यांसाठी नवनवीन फोटो शेअर करत असते.
-
नुकतेच प्राजक्ताने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर काही सुंदर आणि मोहक फोटो पोस्ट केले आहेत.
-
या नवीन फोटोंमध्ये प्राजक्ताने गडद गुलाबी (Rani Pink) रंगाची भरजरी साडी परिधान केलेली दिसत आहे.
-
या साडीचा लांब पदर आणि त्यावर केलेले नाजूक वर्क तिच्या सौंदर्याला अधिकच उठाव देत आहे.
-
डोक्यावर माथापट्टी आणि हातात नाजूक बांगड्या असा तिचा हा शाही लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारून प्राजक्ता घराघरांत पोहोचली.
-
प्राजक्ताचा हा नवा मराठमोळा अवतार सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून चाहते त्यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)
Trump Anti India Post: “भारत-चीन ही तर नरकाची द्वारं”, डोनाल्ड ट्रम्प यांची आता जन्मसिद्ध नागरिकत्वावरून आगपाखड