-
मेघन जाधव व अनुष्का पिंपुटकर मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय सेलिब्रिटी जोडी आहे.
-
मेघन व अनुष्का यांनी ‘स्टार प्रवाह’वरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत पहिल्यांदा एकत्र काम केलं. मालिकेतील त्यांची केमिस्ट्री अनेकांना आवडली.
-
मालिकेनंतर या दोघांनी खऱ्या आयुष्यातसुद्धा लग्न करण्याचा निर्णय घेतला. २०२५मध्ये दोघांनी कुटुंबीयांच्या आणि इंडस्ट्रीतील जवळच्या मित्र-मैत्रिणीच्या साक्षीने लग्न केलं.
-
‘रंग माझा वेगळा’नंतर अनुष्का ‘स्टार प्रवाह’वरीलच ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत झळकली तर मेघनची ‘झी मराठी’वरील ‘लक्ष्मीनिवास’मध्ये एन्ट्री झाली.
-
मेघन या मालिकेत जयंत कानेटकर हे पात्र साकारत आहे. यामध्ये तो खलनायकाच्या भूमिकेत आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-
मेघनने जयंत या खलनायकाच्या भूमिकेतून त्याच्या अभिनयाने अनेकांची मनं जिंकली. स्क्रीनवरील त्याचा टॉक्सीक स्वभाव, वैचारिक दबदबा अशा गोष्टींमुळे त्याचं पात्र खूप हिट ठरलं आणि मालिकेतील जयंत व जान्हवी यांची जोडी चर्चेचा विषय ठरली.
-
मेघन मालिकेत जरी टॉक्सिक अशा खलनायकाची भूमिका साकारत असला तरी खऱ्या आयुष्यात मात्र तो सभ्य आणि प्रेमळ नवरा आहे. तो त्याची बायको अनुष्काबरोबरचे अनेक फोटो पोस्ट करत असतो.
-
मेघनचे सहकलाकार, त्याचे कुटुंबीय अनेकदा मुलाखतीमधून तो स्क्रीनवर जसा आहे तसा ऑफस्क्रीन अजिबात नसल्याचं सांगतात. अशातच आता त्याची बायको अनुष्काने त्याच्याबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
-
अनुष्काने या फोटोंना तिने ‘मेन कॅरेक्टर एनर्जी, ड्युओ एडिशन’ अशी कॅप्शन दिली आहे. मेघन मालिकेत जरी त्याच्या बायकोचा छळ करत असला तरी खऱ्या आयुष्यात मात्र त्याच्या बायकोवर खूप प्रेम करतो. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
१ नंबर! विद्यार्थ्यांसह शिक्षिकेने धरला ठेका, ‘मुकाबला’वर केला जबरदस्त डान्स; पाहा VIDEO